नमस्कार मंडळी! तुमचं सगळ्यांचं माझ्या ब्लॉग वरती स्वागत आहे. मंडळी खाद्यप्रेमिंसाठी महाराष्ट्र म्हंटल की सर्वात पहिल्यांदा डोळ्यांसमोर येणारा खाद्यपदार्थ म्हणजे वडा पाव.
वडा पाव सर्वांचाच खूप आवडता खाद्यपदार्थ आहे. वडापाव चवीला झणझणीत आणि खूप स्वादिष्ट असा पदार्थ आहे. महाराष्ट्रात वडापाव एक स्ट्रीट साईड खाद्यपदार्थ म्हणून खूप प्रसिद्ध आहे.मुंबईचा वडापाव तर जगप्रसिध्द आहे. मग प्रत्येक ठिकाणानुसार व तिथल्या खासियत प्रमाणे वडापाव ची चव बदलत असते. असं म्हणा उत्तमोत्तम होत जाते. इतर राज्यांमधेही वडापाव अगदी आवडीने खाल्ला जातो.
तर मंडळी आपण आज ह्या ब्लॉग मध्ये घरी वडापाव कसा बनवायचा ते पाहणार आहोत. त्यासाठी लागणारे साहित्य आणि बनवण्याची कृती आपण पुढील पार्ट मध्ये पाहणार आहोत.
चला तर मग बघूया वडापाव बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती :
साहित्य :
1. बटाटे
2. बेसन पीठ
3. लसूण
4. आलं
5. कोथिंबीर
6. मोहरी
7. हळद
8. मीठ
9. तेल
10. मिरची
11. पाणी
12. ओवा
13. खाण्याचा सोडा
कृती स्टेप बाय स्टेप :
भाजी :
1. पहिल्यांदा बटाटे उकडून घ्यावेत.
2.उकडलेले बटाटे सोलून कुसकूरण घ्यावेत.
3. एकीकडे मिरची, आलं, कोथिंबीर आणि लसूण यांचं बारीक वाटण करून घ्यावे.
3. एका कढईत किंवा पातेल्यात फोडणीसाठी तेल घ्यावे. तेल गरम झाल्यानंतर त्यामधे मोहरी घालावी. मोहरी छान तडतडायला लागल्यावर त्यामध्ये आपण केलेलं वाटण घालावे. वाटण मंद अचेवर छान परतून घ्यावे. त्यानंतर त्यामध्ये हळद घालावी व पुन्हा छान परतून घ्यावे.
4. कुस्करलेला बटाटा आता आपण बनवलेल्या फोडणीत घालावा आणि छान मंद आचेवर परतत रहावा. त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालावे.
अशाप्रकारे आपली भाजी तयार होईल.
आता पाहुयात वडापाव वरील आवरण बनवण्याची कृती :
1. पहिल्यांदा एका खोलगट पातेल्यामध्ये किंवा बाउल मध्ये आवश्यक तेवढे बेसन घ्यावे. त्यामध्ये थोडा ओवा हातावर रगडून घालावा. त्यामुळे उत्तम चव येते आणि पचण्यास ही त्याचा फायदा होतो.
2. आता बेसनमध्ये हळूहळू पाणी घालत एक पातळ-जाडसर मिश्रण बनवून घ्यावे. त्यामध्ये चविपुरते मीठ घालावे.
3. बेसनाच्या मिश्रणात चिमूटभर खाण्याचा सोडा घालावा. त्याने वडे अगदी टम्म फुगतात.
मंडळी आता वडापाव बनवण्यासाठी लागनाऱ्या सगळ्या गोष्टींची तरतूद झाली आहे. आता फक्त वडे बनवणे आणि त्यांचा मनातून आस्वाद घेणं शिल्लक आहे.
उशीर न करता पाहुयात पुढील कृती :
1. आता एका कढईत वडे तळण्यासाठी तेल गरम करत ठेवा.
2. आपण बनवलेल्या बटाटा भाजीचे मध्यम आकाराचे गोळे करून घ्या. गोळे दोन्ही हातांच्या मधे ठेवा व मधून हलकेच दाबा. म्हणजे गोळ्यांवर बेसनच आवरण व्यवस्थित बसेल.
3. आता बटाट्याचे हे गोळे त्या बेसनच्या मिश्रणात बुडवा व कढईतील गरम तेलात तळण्यासाठी सोडा. वडे मंद आचेवर छान खरपूस तळून घ्या.
4. पावासोबत मस्त गरम गरम वडा सर्व्ह करा. सोबत तळलेली मिरची आणि लसूण-सुख्या खोबऱ्याची तिखट सुखी चटणी असेल तर मजा काही निराळीच.
मला आशा आहे तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल. तर मग घरी नक्की करून बघा. तुमची प्रतिक्रिया मला कळवायला विसरू नका.
अशाच प्रकारच्या पोस्ट वाचण्यासाठी आणि आणखी वेगवेगळ्या रेसिपीस जाणून घेण्यासाठी माझे ब्लॉग्स वाचत राहा.
धन्यवाद!



Comments
Post a Comment