हॅलो मंडळी! आजचा ब्लॉग जरा खास आहे कारण आज मी तुमच्या साठी जी रेसिपी घेऊन आले आहे ती सर्वांचीच खूप आवडती आणि सुप्रसिद्ध आहे. त्यामुळे हा ब्लॉग नक्की वाचा.
तर मित्रानो, आजची खास अशी रेसिपी जिचं नाव आहे मुंबई स्टाईल पावभाजी. पावभाजी ही लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांचीच अत्यंत आवडती अशी डिश आहे. आज आपण ही पावभाजी अगदी मुंबईच्या पावभाजी इतकीच चविष्ट घरीच बनवण्याची रेसिपी पाहणार आहोत. चला तर मग सुरु करूयात आजचा ब्लॉग.
पावभाजी बनवण्याची साहित्य आणि कृती आपण पाहुयात.
साहित्य :
1. बटाटे
2. बीट
3. भिजवलेले वाटणे किंवा ओले मटार
4. फ्लॉवर गड्डा
5. गाजर
6. टोमॅटो
7. शिमला मिरची
8. कांदा
9. हळद
10. लाल तिखट किंवा काश्मिरी तिखट
11. कसुरी मेथी
12. तेल
13. बटर
14. मिठ
15. पाणी
16. पावभाजी मसाला
कृती :
1. पहिल्यांदा सगळ्या बटाटे, गाजर, बीट, भिजवलेले वाटणे किंवा मग ओले मटार, टोमॅटो, फ्लावर एका भांड्यात किंवा कुकरच्या सहाय्याने शिजवून घ्या. बिटामुळे भाजीला एक सुंदर रंग प्राप्त होतो.
2. एका कढईत फोडणीसाठी तेल घ्या. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली शिमला मिरची घाला. कांदा आणि शिमला मिरची तेलात चांगली परतून घ्या. नंतर त्यामध्ये हळद घाला.
3. एकीकडे शिजलेल्या भाज्या स्म्याशरच्या साहाय्याने स्म्याश करून घ्या. नंतर काढीत सगळ्या स्म्याश केलेल्या भाज्या घाला व छान मंद आचेवर परतून घ्या.
4. आता भाज्यांमध्ये थोडी हळद घालून पुन्हा एकदा परतून घ्या. नंतर त्यामध्ये काश्मिरी लाल तिखट घाला. भाजी सारखी परतत राहा.
5. आता भाजीमध्ये पाणी घाला. जेवढी दाट भाजी हवी असेल त्या प्रमाणात पाणी घाला. भाजी मंद आचेवर शिजवत राहा.
6. भाजीला उकळी आली की त्यामध्ये चवीनुसार मीठ घाला.
7. पावभाजी मसाला घालायला विसरू नका. पावभाजी मसाला घाला. व झाकण ठेऊन भाजी शिजवून घ्या.
8. मुंबईच्या पावभाजी सारखी चव येण्याकरिता, भाजी शिजल्यावर त्यामध्ये कसुरी मेथी जरा हातांच्या साहाय्याने रगडून घाला व भाजी ढवळून घ्या.
9. गरम तव्यामध्ये थोडं बटर, थोडी भाजी घालून त्यावर पाव चांगले भाजून घ्या.
10. आता गरम गरम भाजीमध्ये बटर घालून पवासोबत खाण्यासाठी सर्व्ह करा मुंबईची सुप्रसिद्ध पावभाजी.
मंडळी,अशाप्रकारे आपली पावभाजी तयार होईल. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कंमेंट सेकशन मध्ये लिहून सांगा. तुमच्या प्रतिक्रिया खूप इम्पॉर्टन्ट आहेत. अशाच नवनवीन रेसिपीस जाणून घेण्यासाठी माझे ब्लॉग्स वाचत राहा. तुमची काळजी घ्या आणि विविध खाद्य पदार्थांचा आस्वाद घेत राहा.
धन्यवाद!


Comments
Post a Comment