Bharal vang recipe in marathi| bharal वांग recipe |भरले वांगी कस बनवायचं |bharal vang kas banvaych recipe




नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉगवर ज्याचं नाव आहे shital's Recipes marathi. आज तुमच्यासाठी मी घेऊन आले आहे भरलं वांग्याची रेसिपि.

  मंडळी भरलं वांग संपूर्ण महाराष्ट्रात खूप फेमस आहे आणि ते खूप आवडीने खाल्ली जाणारी एक डिश आहे. हा एक परंपारिक पदार्थ आहे. दक्षिण महाराष्ट्रात हे भरलं वांग एकदम झणझणीत बनवलं जात.

तर चला मग पाहुयात भरलं वांग कस बनवायचं ते,

Bharal vang recipe in marathi| how to make bharal vang.


भरलं वांग बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती खालीलप्रमाणे आहे.


साहित्य :

1. लहान आकारची कोवळी वांगी

2. भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट

3. आले लसूण पेस्ट

4. कांदा

5. लाल तिखट

6. हळद

7. तेल

8. पाणी


कृती :


1. भरलेलं वांग बनवण्यासाठी सर्वप्रथम वांगी स्वच्छ धुवून घ्यावीत.


2. वांग्याचे देठ कापून टाकावेत.


3. वांग्याचे वरून चार अर्ध्यापर्यंत क्रॉस भेगा पाडून घ्याव्यात.


4. आता एका बाउल मध्ये शेंदण्याचं कूट घ्या व त्यामध्ये आले -लसूण पेस्ट, आपल्या आवडीनुसार लाल तिखट, हळद घालावे, चवीनुसार मीठ घालावे.


5. हाताला थोडं पाणी लावून सगळं मिश्रण एकजीव करून घ्यावे.


6. आता हे मिश्रण एक घास होईल एवढ्या मापाने वांग्याच्या भेंगांमध्ये भरावे आणि हाताने भेगा लिपून घ्याव्यात व त्या मुजव्याव्यात. अशाप्रकारे सगळी वांगी तयार करून घ्यावीत.


7.  आता एका भांड्यात फोडणीसाठी तेल गरम करत ठेवावे, तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यावा.


8. त्यामध्ये लगेच थोडी हळद आणि चिमूटभर मीठ घालावे व परतून घ्यावे.


9. आता भरलेली वांगी भांड्यात घालावीत, वरून अर्धी वाटी पाणी घालावे आणि शेंगदाण्याचं मिश्रण घालावे.


10. वांगी दहा मिनिटे मध्यम आचेवर शिजत ठेवावीत. त्यानंतर भाकरी सोबत खाण्यासाठी सर्व्ह करावी.


तर मंडळी अशाप्रकारे आपण भरली वांगी बनवू शकतो.

तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कंमेंट करून सांगा. शिवाय तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा कळवायला विसरू नका. आता तुमचा निरोप घेते तोपर्यंत तुमची काळजी घेत राहा आणि हो खात राहा, आनंदी राहा.

धन्यवाद!







Comments

Post a Comment