Ghavan|ghavane|कोकणातील फेमस घावण असे बनवा | घावणे रेसिपी मराठी| घावणे रेसिपी|ghavan recipe in marathi

Ghavan | ghavan | ghavan recipe | घावन रेसिपी इन मराठी | घावन कसे करायचे


 मंडळी कोकण म्हंटल की आपल्या डोळयांसमोर येतो तो विशाल समुद्र किनारा आणि हिरवंगार निसर्ग सौन्दर्य. त्याचबरोबर कोकणातील खाद्यसंस्कृती तीही तितकीच वर्णनीय आणि रुचकर आहे. कुळीथाची पिठी,सोलकढी, झिंगे व बांगड्याच कालवण, वालाचं भिरड, विविध राणभज्या, आळंब्याच कालवण अशा एक नाही अनेक पदार्थांचा वसा कोकणला लाभला आहे.

आज मी अशीच एक सर्वांची आवडती व कोकणची शान असलेली रेसिपी तुमच्यासाठी आणली आहे तीच नाव आहे घावणे. आल ना तुमच्या तोंडाला पाणी, तर मग वेळ न दवडता पाहूया की घरच्या घरी झटपट मऊ व लुसलुशीत जाळीदार घावणे कस बनवायचं ते.

चला तर मग पाहुयात घावणे बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि घावणे बनवण्याची कृती.

Ingredients required for making Ghavan:

साहित्य :

1. तांदळाचे पीठ

2. मीठ

3. तेल

4. कांदा

5. पाणी

Process of making Ghavan:




1. एका भांड्यात तांदळाचे पीठ घ्या. पीठात पाणी घालून एक जीव करून घ्या. चवीनुसार मीठ घाला. जास्त पातळ पण थोडं घट्ट असं पीठ करून घ्या.पिठात गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्या.


2. गॅस किंवा चुलीवर भिड्याचा तवा किंवा नॉनस्टिक तवा ठेवा.


3. कांदा अर्धा चिरून दोन भाग बनवून घ्या. अर्ध्या कांद्याच्या साहाय्याने तेल तव्यावर लावून घ्या.


4. वाटीत तयार केलेलं पीठ घ्या आणि तव्यावर एकसारख तवा भरून घावणे घालून घ्या.


5. एक साईड चांगली भाजून घ्या आणि घावणे उचलून परता आणि दुसरी बाजू भाजली की तव्या बाहेर काढून घ्या.


6. गरम गरम घावणे चहा किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा.


अशाप्रकारे आपले घावणे तयार होईल. तर घरी नक्की करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला comments द्वारे कळवा. असेच नवनवीन पदार्थांचा आस्वाद घेत राहा. भेटूयात एका नवीन लज्जतदार ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या.

धन्यवाद!



Comments